पिंपळगाव हरे येथे कालिंका माता मंदिर ते शनी महाराज चौक, नवी ग्राम पंचायत कडे जाणाऱ्या ररस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीने सुरु.
पिंपळगाव हरे येथे कालिंका माता मंदिर ते शनी महाराज चौक, नवी ग्राम पंचायत कडे जाणाऱ्या ररस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीने सुरु.
पिंपळगाव हरेश्वर येथे कालिंका माता मंदिर ते शनी चौक नवी ग्राम पंचायत कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण सुरु आहे हे काम अतिशय बोगस होत असल्याने गावातील सुज्ञ नागरिकांनी रस्त्याचे बोगस होणारे काम 16 मे रोजी बंद पाडले व काम चांगल्या प्रकारे व्हावे अशी मागणी केली आहे.ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीसाठी योग्य व्हावे म्हणून राज्यात मुख्यमंत्री सडक योजना कार्यान्वित आहे.
कालिंका माता मंदिर ते नवी ग्राम पंचायत, श्री समर्थ गोविंद महाराज मंदिराकडे जाणारा हा रस्ता गावातील मुख्य रस्ता आहे या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून.या रस्त्यावरील पहिले डांबर न काढता त्याच डांबर वर्ती खडी टाकून दबाई होत आहे अश्या प्रकारे जर रस्त्यावर रस्ता केला तर एका पावसात रस्ता वाहून जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पहिला असलेला डांबरी रस्ता खोदून मगच त्यावर दुसरी खडी टाकावी व ररस्त्याचे सेंटर काढून रस्ता करावा अशी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.. या रस्त्याकडे गावातील लोकप्रतिनिधी व अधिकारी जाणीव पूर्वक दुलर्क्ष करीत असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे..
जो पर्यंत चांगला रस्ता बनवणार नाही तो पर्यंत रस्त्याचे काम बंद राहील असे ग्रामस्थांनी दिपलक्ष मराठी न्यूज सोबत बोलतांना सांगितले.
Comments
Post a Comment