पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.
अकोल्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक तरुणाने आपल्या बहिणीला बारावीच्या परिक्षेत कॉपी पुरवण्यासाठी तोतया पोलीस होऊन परीक्षा केंद्रावर पोहचला. मात्र त्याच्या एका चुकीमुळे पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अकोल्यातील पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा सुरू होणार होती. तेथे एक तरुण परीक्षेदरम्यान पोलिसांचा गणवेश परिधान करून केंद्रावर पोहोचला. यावेळी वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्याने सॅल्यूट केला. सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नसल्याने तो पकडला गेला. उपलब्ध माहितीनुसार, अकोल्यातील पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा सुरू होणार होती. तेथे एक तरुण परीक्षेदरम्यान पोलिसांचा गणवेश परिधान करून केंद्रावर पोहोचला. यावेळी वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्याने सॅल्यूट केला. सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नसल्याने तो पकडला गेला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या २४ वर्षीय आरोपीचे नाव अनुपम मदन खंदारे आहे. तो बंदीचा रहिवासी आहे. त्याचा बहिणीची परीक्षा पातूरच्या शाहबाबू हायस्कूलमध्ये होती. अनुपम खंदारे पोलिसांचा परिधान करून परीक्षा केंद्रावर पोहोचला. बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर फिरू लागला. त्यावेळी सुरक्षेसाठी पातूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे त्यांच्या पथकासह परीक्षा केंद्रावर पोहोचले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाहताच अनुपम यांनी त्यांना सॅल्यूट केला, मात्र त्यांची सॅल्युट पाहून पोलीसांना संशय बळावला. तरुणाने घातलेल्या गणवेशावरील नेम प्लेटही चुकीची होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी त्याची चौकशी केली. झडती घेतली असता त्याच्या खिशात इंग्रजी भाषेची प्रत सापडली. यानंतर पोलीसांनी त्याच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..