पिंपळगाव हरेश्र्वर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न...

पिंपळगाव हरेश्र्वर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न..


बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती निमित्त ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. व याच हेतून पिंपळगाव हरेश्वर येथील मूकबधिर शाळेमध्ये मध्ये  वडगाव येथील  भा.ज.पा.आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील व देशदूचे पत्रकार गजानन भाऊ लादे सातगाव डोंगरी यांच्या माध्यमातून पत्रकार सन्मान सोहळा दि.७-१-२०२४  रविवार रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळेस पिंपळगाव हरेश्र्वर परीसरातील सर्व पत्रकार बंधुंना आमंत्रित करण्यात आले.व या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अर्जुन जाधव सर होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव हरेश्वर येथील एपीआय महेंद्र वाघमारे ,पीएसआय अमोल पवार व संदीप पाटील व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर लोहार  
व मुक बधीर विद्यालयाचे  मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर होते. या वेळेस सुत्र संचालन मनगटे सर यांनी केले . सर्वप्रथम दीप प्रज्वलन बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेचं पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व प्रास्ताविक लोहार सरांनी केले पत्रकार विषयी संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.व ऐ.पी आय.साहेबांनी पत्रकारांना अनमोल मार्गदर्शन केले व शेवटी अध्यक्षांनी मार्गदर्शन केले.व संदीप सराफ यांनी आभार मानले.  या वेळेस मुक बधीर  विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय साहित्य वही पेन भेट  देण्यात आले.व पत्रकार बंधुंना गजानन भाऊ लादे यांच्या कडून श्री स्वामी समर्थ प्रतीमा भेट देण्यात आली.व पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन चे वतीने  वाघमारे साहेब यांनी पत्रकारांना सन्मानित केले. व  गजानन लाधे यांनी भोजनची व्यवस्था केली अतीशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये  पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
या वेळेस उपस्थित.......
 पिपळगाव परिसर  पत्रकार सघटनेचे सर्व पत्रकार पोलीस कर्मचारी  शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक  उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.