अल्पवयीन मुलीचा विनयभंग;पिंपळगाव (हरे)पोलिसात गुन्हा दाखल...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग;पिंपळगाव (हरे)पोलिसात गुन्हा दाखल...

पाचोरा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याने तीच्या घरी जावुन एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पिंपळगाव (हरे)पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २ जुलै रोजी घरी एकटी असतांना संशयित आरोपी दिनेश गायकवाड वय 30 हा मुलीच्या घरी जात म्हणाला कि, मी साप पकडला आहे तुला दाखवू का ? असे म्हणून अल्पवयीन मुलीला त्याने बरणीमधून साप दाखविला व पुन्हा थैलीमध्ये ठेवला यानंतर मुलीला विचारू लागला घरातील लोक कुठे गेले आहेत. मुलीने सांगितले सार्वजन बाहेर गेले आहे. तर संशयिताने अल्पवयीन मुलीस म्हणाला कि, माझ्यासोबत फ्रेडशिप करशील का ? तिने यावर नकार दिला असता संशयिताने तिचा हात पकडला तिने कसाबसा हात सोडला त्यानंतर त्याने मुलीला पिण्यासाठी पाणी मागितले पाणी पिल्यावर पुन्हा त्याने अल्पवयीन मुलीस लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याने अल्पवयीन मुलीने दि.४ रोजी पिंपळगाव पोलिसात धाव घेत संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.महेद्र वाघमारे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..