ग्राम विकास विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.अंदाजे 1 कोटी रुपयांची देणगी इमारत बांधणी साठी जमा.
ग्राम विकास विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.
अंदाजे 1 कोटी रुपयांची देणगी इमारत बांधणी साठी जमा.
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालयाला तब्बल 65 वर्षे पूर्ण झाल्याने माजी विधार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला सन 1965 पासून चे माजी विद्यार्थी हजर होते.मेळाव्याचे मुख्य कारण म्हणजे ग्राम विकास विध्यालयाच्या मुख्य इमारतीस आज जवळपास 65 वर्ष झाले असून इमारत जीर्ण होत आहे.काही वर्षा पूर्वी रात्रीच्या वेळेस एका बाजूकडील इमारत रात्रीच्या वेळी अचानक पणे पडण्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही पण भविष्यात असा प्रसंग येऊ नये त्या साठी ग्राम विकास मंडळ अध्यक्ष, चिटणीस,व संचालक मंडळ यांनी नवीन इमारत बांधण्याच्या निर्यण घेतला त्या अनुषंगाने हा मेळावा बोलावण्यात आला होता.
मेळाव्याची सुरुवात आज हरिभाऊ सभागृह येथे कार्यक्रमाचे उदघाटक माजी कुलगुरू आण्णासाहेब के.बी. पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वल करून मेळाव्याची सुरवात करण्यात आली.माजी विध्यार्थी मेळाव्याला अध्यक्ष म्हणून सेवा निवृत्त प्राध्यापक नवनाथ दंडगव्हाळ हे लाभले.
तसेच मान्यवरांचे स्वागत कु.स्वरांजली संजय पाटील व शाळेतील विद्यार्थिनींनी सुंदर असे स्वागत गीत गायन करून स्वागत केले.यामध्ये सुनील पाटील सर, अर्जुन सावळे सर,व सुनील लोहार सर यांची साथ लाभली.
ग्राम विकास विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अश्विनी प्रसन्न देशमुख हिने नवीन इमारत कशी असावी हे तिच्या कल्पनेतून डिजाईन केलेला व्हिडिओ हा मेळाव्यात प्रोजेक्टर द्वारे दाखविण्यात आला.
ग्राम विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष पि,बी,पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात नवीन इमारती साठी निधी देणाऱ्याची नावे.जाहीर करून सत्कार करण्यात आला ह्या कार्यक्रम प्रसंगी नवीन इमारत बांधणी साठी अंदाजे एक कोटी रुपयांची देणगी पावत्या घोषित जमा झाल्या.
सूत्र संचालन :-अभिजित पाटील, मनोज सोनावणे,संदीप पाटील यांनी केले तसेच आलेल्या मान्यवरांचे आभार व्ही आर पाटील यांनी मानले.
ह्या प्रसंगी शाळेचे मागील 65 वर्ष्या पासून चे माजी विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्तित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आण्णासाहेब के.बी.पाटील माजी कुलगुरू जळगाव,श्री.नवनाथ दांडगव्हाळ सेवा निवृत्त प्राध्यापक धुळे,नायब तहसीलदार भडगाव मुकेश हिवाळे,
ग्राम विकास मंडळ अध्यक्ष पिंपळगाव हरेश्वर.ता.पाचोरा प्रकाश बाजीराव पाटील चिटणीस:-सुखदेव विठ्ठल गीते.संचालक:-भास्कर धनजी पाटील संचालक:-दिपक हरसिंग सोनावणे, संचालक:-रंगलाल गोविंदा राठोड, संचालक :- रंजीता मनोज बडगुजर, संचालक:- भैय्या विलास मधुकरराव गरुड,संचालक:- दिलीप फुलचंद जैन,संचालक:- कडुबा बालचंद तेली,संचालक:- डॉ.शांतीलाल गेंदीलाल तेली, संचालक:- जनार्दन ओंकार देव,संचालक :- अशोक कृष्णराव पाटील,संचालक:- अशोक दत्तू पाटील,संचालक:- प्रदीप रघुनाथ बडगुजर,संचालक:- सुरेश काशिनाथ बडगुजर,ग्राम विकास विद्यालय मुख्याध्यापक प्रमोद महाजन,खाजगी प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे,श्रीमती.एस.बी.नाईक मुख्याध्यापिका आश्रम शाळा वरसाडे तांडा,श्री.एस.बी.राठोड,मुख्याध्यापक आश्रम शाळा वरसाडे
नियोजन समिती सदस्य प्रमुख पि.आर.देशमुख, उप प्रमुख यू.एस.पाटील सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,गावातील माजी विध्यार्थी संघ,गावातील
Comments
Post a Comment