विवाहितेच्या ओळखीचा फायदा घेत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.....
विवाहितेच्या ओळखीचा फायदा घेत जिवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.....
पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारा गावातील वैभव ईश्वर चौधरी याने त्याच्या मित्राची वहिनी या महिलेशी ओळखीचा फायदा घेवून सुमारे दीड महिन्यापूर्वी विवाहितेचा पती सासू-सासरे व दिर शेतात गेलेले असताना पीडित महिला ही घरी एकटी असल्याची बघून वैभव चौधरी याने तिचे घरात प्रवेश करून मला तुझ्या सोबत शरीर संबंध करू दे असे धमकावून महिलेची ची इच्छा व संमती नसताना तिचे सोबत जबरीने शरीर संबंध केले. त्यावेळी त्यांनी त्याचे मोबाईल मध्ये दोघांचे फोटो काढले होते सदर फोटो तुझ्या सासू-सासरे व पती ला दाखवील अशी धमकी देऊन वेळोवेळी विवाहितेच्या संमती विरुद्ध जबरी संभोग केला तसेच दिनांक 07/10/2022 रोजी दुपारी पीडित महिला ही घरी एकटी असताना आरोपी वैभव चौधरी तिचे घरात गेला असता त्यावेळी महिलेच्या सासू-सासरे व पती शेतातून घरी परत आल्याने पीडित महिलेच्या पती व सासू-सासर्यांनी तू आमच्या घरात काय करतो असे विचारल्याने वैभव चौधरी यांनी पीडित महिलेच्या पती व सासऱ्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच सदर घटनेचा आरडाओरडा ऐकून ऋषी न्यानेश्वर चौधरी यांनी लाकडी काठीने महिलेच्या पती यास डोक्यास मारले पीडित महिलेच्या यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर गुरनंबर 298 /20 22 भादवि कलम 376 354क 452 324 323 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यात आरोपी वैभव चौधरी यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सदर चा तपास मा.पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे सर, मा.अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांचे आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.
Comments
Post a Comment