पाचोरा -भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना निवेदन.

पाचोरा -भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना निवेदन.


पाचोरा व भडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे  पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे अशा अडचणीच्या अवस्थेत शेतकरी असताना प्रशासनाने आपले अधिकाराचा वापर करून शासनाच्या वरिष्ठ आदेशाची वाट न बघता तातडीने पाचोरा व भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट पंचनामे करून राष्ट्रीय सहायता निधी व राज्याच्या मदत निधीतून व शासनाचा अन्य तरतुदीमधुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे .तसेच पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या क्लेम प्रमाणे तातडीने पंचनामे करून दिवाळीपूर्वी रक्कम जमा करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल यांना देण्यात आले.



यावेळी शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शेतकरी सेनेचे अरूण पाटील, रमेश बाफना, तालुका प्रमुख शरद पाटील, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, दत्तात्रय जडे यांच्या सह पदाधिकारी उपस्थितीत होते.   

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.