पाचोरा!पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचा लाचखोर हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात ४,००० हजाराची लाच भोवली..

चार हजारांची लाच भोवली
पाचोरा!पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचा लाचखोर हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात ४,००० हजाराची लाच भोवली..


पाचोरा!पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्याचा लाचखोर हवालदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात ४,००० हजाराची लाच भोवली..
तक्रारदार शेतकर्‍याची बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्‍या पिंपळगाव हरेश्वर, तालुका पाचोरा पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
राकेश खोंडे असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील तक्रादार शेतकर्‍याने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधितानी ती परत दिली नाही उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकर्‍याने तक्रार दाखल केली.
या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव हरेश्वरातील पोलीस हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराकडे चार हजार असल्याने त्यावर तडजोड झाली.
तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची मंगळवारी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला.
एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायीकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक केली.
विशेष म्हणजे आरोपी हवालदार हा रजेवर असल्याची माहिती आहे.
यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.