ग्राम विकास मंडळ येथील असलेल्या मतदान राजांना जाहीर आवाहन व नम्र विनंती


ग्राम विकास मंडळाचे सदस्य मतदार बंधू -बघिनी तसेच पिंपळगाव हरे व परिसरांतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक यांस… 
उद्या आपण आपल्या परिसरांतील मुलांचे भविष्य / भवितव्य ठरविणार आहोत त्यामुळे कुठल्याही आमिषांना बळी पडू नये. आपणांस माहीत आहे की आपल्या ग्राम विकास विद्यालयाची ही निवडणूक दीर्घ कालावधी नंतर आता होत आहे. 
मी स्वतः जरी मतदार नसलो तरी मी संस्थेचा माजी विद्यार्थी व संस्थेचा हितचिंतक असून शैक्षणिक क्षेत्रात गेल्या २५ पेक्षा अधिक वर्षे कार्यरत आहे…. म्हणून मी आपणांस विनंती करतो की उच्च विद्याविभूषित तसेच शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचे चांगले व पारदर्शक कार्य आहे अशाच उमेदवारांना निवडून द्या… आपला चूकीचा निर्णय पुढील काही पिढ्यांना भोगावा लागू शकतो याची जाणीव ठेऊन योग्य उमेदवारांना निवडून द्या…. एखाद्या देशाचे भवितव्य नष्ट करायचे असेल तर ” त्या देशातील शिक्षण व्यवस्थेवर घाला घातला पाहिजे” असे म्हटले जाते …. यावरून आपणांस शिक्षणाचे व शिक्षण संस्थांचे महत्व कळेल. म्हणून शैक्षणिक संस्था योग्य, पात्र, लायक तसेच शैक्षणिक क्षेत्रांत ज्यांचे योगदान आहे   अशांच्या ताब्यात दिल्या पाहिजेत … त्याशिवाय परिसराचा विकास शक्य नाही …. शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांना कामाचे स्वातंत्र्य असले पाहिजे, त्यांच्या कामात हस्तक्षेप नको, विधायक व सुयोग्य मार्गदर्शन हवे, विद्यार्थी हित सर्वप्रथम असे मानणारी  मंडळी संस्थेत असावी…..
लोकशाही मधे बर्याचदा आपण म्हणत असतो की आम्हाला योग्य पर्याय नाही परंतू आज आपणांस सक्षम पर्याय दिलेला आहे जर आपण ह्या संधी चा योग्य वापर न करता तात्कालिक फायदा बघून मतदान केले तर येणारी पिढी आपणांस माफ करणार नाही त्यामुळे  सद्सद् विवेक बुध्दीने मतदान करावे ही विनंती ….. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण मोडण्याची गरज आहे …. त्यासाठी पैसा घेऊन मतदान करू नका… निर्भीडपणे मतदान करा ..…. लक्षात ठेवा की निवडणूकीत खर्च केलेला पैसा हा नंतर आपल्या कडूनच वेगळ्या मार्गाने वसूल केला जातो त्यामुळे कुठल्याही अमिषाला / प्रलोभनाला बळी न पडता सुसंस्कृत उमेदवारांनाच निवडून द्या व आपली शाळा योग्य नेतृत्वाच्या हाती सुपूर्त करा ही कळकळीची विनंती …. 
प्रा.(डॅा) आर. आर. देशमुख
कुलसचिव, ICT, मुंबई

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.