तरुणाची भर चौकात चाकू भोसकून हत्या !

तरुणाची भर चौकात चाकू भोसकून तरुणाची हत्या !
एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाच्या पोटात चाकू भोसकून एकाने हत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील वाघळी गावात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त, तालुक्यातील वाघळी येथील व्यायाम शाळेजवळ मोहन विजय हाडपे व त्यांचा मित्र प्रवीण पुरूषोत्तम धनगर यांना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून काल सायंकाळी लोखंडी रॉडने मारहाण झाली. यात प्रवीण धनगर याच्यासोबत टोळके देखील होते. ही मारहाण सुरु असताना मोहनचे काका रवींद्र भास्कर हाडपे व सुनील सुभाष धनगर यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. हा सर्व प्रकार सुरू असतांनाच रवींद्र भास्कर हाडपे यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आदिल साजीद खाटीक यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर गावातील तलाठी कार्यालयाजवळ तनावर साजीद खाटीक व समीर सैयद खाटीक यांनी मोहन विजय हाडपे (वय-१८) याचे दोन्ही हात पकडून ठेवले. आणि आदिल साजीत खाटीक याने आपल्या हातात असलेला चाकू पोटात भोसकून हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार (ता. १२) रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
उडाली असून घटनेची माहिती मिळताच
या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी धाव घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान या घटनेप्रकरणी रवींद्र भास्कर हाडपे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १०९ अशा विविध कलमान्वये सैयद मुसा खाटीक, साजीद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजीद खाटीक व समीर सैयद खाटीक सर्व रा. वाघळी ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि कुणाल चव्हाण हे करीत आहेत. तसेच, या प्रकरणी कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.