जिल्हा परिषद निवडणुकीत पिंपळगाव-भोजे गणातून सौ.शोभाताई शांतीलाल तेली भाजपातर्फे उमेदवारी लढवणार असल्याचे संकेत...

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले

 जिल्हा परिषद निवडणुकीत पिंपळगाव-भोजे  गणातून सौ.शोभाताई  शांतीलाल तेली भाजपातर्फे उमेदवारी लढवणार असल्याचे संकेत...


सौ.शोभा शांतीलाल तेली ह्या पिंपळगाव हरे येथील हरेश्वर वाचनालय सदस्य, व माजी ग्राम पंचायत सदस्य,आहेत त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा लाभलेला आहे असं म्हणे वावगं ठरणार नाही.आणि त्यांनी जनतेसाठी विविध प्रकारची विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत.त्या डॉक्टर शांतीलाल जी तेली यांच्या पत्नी आहेत.

डॉ.शांतीलाल जी तेली हे जिल्हा वैद्यकीय आघाडी सदस्य,माजी तालुका दक्षता समिती अध्यक्ष, अध्यक्ष महाराष्ट्र पदमवंशीय तेली समाज, माजी सरपंच पिंपळगाव हरे, संचालक ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे. महात्मा फुले बहुउद्देशीय  पतसंस्था अध्यक्ष पिंपळगाव हरे.रुग्ण कल्याण समिती सदस्य वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र व पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालय,सामाजिक कार्य, सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहणारे असे शांतीलाल जी तेली. त्यांनी गावासाठी 

जल स्वराज्य योजना आणून संपूर्ण गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला आहे माध्यमातून सर्व गावाला आज पाणी पुरवठा आणली..अशा प्रकारे खूप विकास कामे केलेली आहेत.

तसेच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्या ऐवजी सत्तेशिवाय शहापण करता येत नाही असे धोरण ठरवून जनतेच्या मुलभूत गरजा व अडीअडचणी सोडविण्यासाठी सत्ता हवी असते असे शोभाताई  यांचे मत असून त्यांनी पिंपळगाव-भोजे गणातून भारतीय जनता पार्टीने आपल्याला उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून मी मागील खूप  वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य व पदाधिकारी असल्याकारणाने आम्हाला  पक्षश्रेष्ठी न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा तर्फे आम्ही चार उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इछुक आहोत पक्ष  ज्याच्या वर्ती भरोसा दाखवून उमेदवारीची जबाबदारी देईल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आणू आम्हाला  असे डॉ.शांतीलाल जी तेली यांनी दिप लक्ष मराठी न्युज सोबत बोलतांना सांगितले

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.