हरघर तिरंगा जनजागृतीसाठी मुस्लिम तरुणाने घरदार सोडून करतोय जनजागृती.......सोयगाव तालुक्यातील प्रकार...

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 
हरघर तिरंगा जनजागृतीसाठी मुस्लिम तरुणाने घरदार सोडून करतोय जनजागृती.......सोयगाव तालुक्यातील प्रकार...
छायाचित्र ओळ-मुस्लिम तरुण गावागावंत करतोय जनजागृती 

,दुसऱ्या छायाचित्रात मुस्लिम तरुण वाहनधारकांना हरघर तिरंगा बाबत सांगतांना..

सोयगाव विशेष बाळू शिंदे  प्रतिनिधी दि.११/08/2022

शासनाच्या हरघर तिरंगा मोहीमे साठी तालुका प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून हरघर तिरंगा मोहिमेची जनजागृतीसाठी मुस्लिम तरुणाने आठवडाभरापासून घरदार सोडून तालुक्यात जनजागृतीसाठी भटकंती सुरू केली आहे.यंदाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दि.१३ ते दि.१७ पर्यंत हरघर तिरंगा मोहीम हाती घेण्यात आली आहे यासाठी तालुका पातळीवरन गावांना जनजागृती सुरू आहे परंतु स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होऊन प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांच्या आठवणी कायम तेवत राहव्या यासाठी ही मोहीम अधिकच तीव्र करण्यासाठी अश्रफ कबीर तडवी(वय २३) या मुस्लिम तरुणाने तालुकभर चांगलीच कम्बर कसली आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावून हा मुस्लिम तरुण तालुक्यात स्वतःच्या दुचाकीवरून फिरून गावागावात हरघर झेंडा याबाबत जनजागृती करत आहे. स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्यांना आदरांजली म्हणून हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी हा मुस्लिम तरुण ग्रामीण भागात आवाहन करत आहे

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..