गरुड विद्यालयाची स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शेंदुर्णी शहरातून रॅली*

कार्यकारी संपादक:-राकेश सुतार 

गरुड विद्यालयाची स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शेंदुर्णी शहरातून रॅली.
शेंदुर्णी:-धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. 
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या या पर्वानिमित्त देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम ७५, नावीन्यपूर्ण कल्पना ७५ नवे संकल्प ७५, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती ७५ आणि अंमलबजावणी ७५ अशा पाच आशय संकल्पना राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा) या अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान देशाभरात २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. 'हर घर तिरंगा' (घरोघरी तिरंगा), स्वराज्य महोत्सव कार्यक्रमांतून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व स्वातंत्र्यवीरांविषयी जाणीवजागृती केली जात आहे. या उत्साहानिमित्त ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान सर्व स्तरावर विविध स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येत आहे. हे औचित्य साधत गरुड विद्यालयात देखील दिनांक 9 ऑगस्ट व 11 ऑगस्ट निमित्त शेंदुर्णी शहरातून स्वातंत्र उत्सवा निमित्त रॅली काढण्यात आली.
 यावेळी दिनांक ९ ऑगस्ट रोजी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड, सचिव दाजीसाहेब सतीश चंद्रजी काशीद ,संचालक सागरमलजी जैन, गोविंदशेठ अग्रवाल इत्यादींनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली यावेळी ९ ऑगस्ट रोजी रॅली ही नगरपंचायत शेंदुर्णी याठिकाणी सुरू करून रथ मार्गाने गावातून फिरून गांधी चौकांमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी देखील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. या नंतर 11 ऑगस्ट रोजी रॅलीची सुरुवात ही प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी येथून करण्यात आली यानंतर संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात ही ढोल-ताशांच्या गजराने काढण्यात आली या रॅलीचे नेतृत्व (एन सी सी)नॅशनल कॅडेट कोर या विद्यार्थ्यांनी केले तसेच उर्वरित सर्व विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले या रॅलीचा समारोप नगरपंचायत शेंदुर्णी या ठिकाणी झाला यावेळी
 विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार यांनी या रॅलीला संबोधित केले व शेंदुर्णी गावाचा इतिहास व भारताच्या स्वातंत्र्य चळवळी मध्ये शेंदुर्णी गावातील लोकांनी सहभाग नोंदवला अशा स्वातंत्र्य सैनिक बद्दलची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यानंतर शेंदुर्णी नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष निलेश दादा थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्याला कशा पद्धतीने हा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करायचे आहे याबद्दल माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी शेंदुर्णी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार, उपमुख्याध्यापक ए बी ठोके, पर्यवेक्षक जे एस जुंबळे, विनोद पाटील सर्व प्राध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते. 

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.