पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे माजी मंत्री कै. के. एम. बापू पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण..

 मुख्य संपादक :-दिपक  मुलमुले

शिंदाड प्रतिनिधी :- संदीप बोरसे

पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे माजी मंत्री कै. के. एम. बापू पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण..



पाचोरा- पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे क्रांती दिनाचे औचित्य साधत माजी मंत्री कै. के.एम. बापू पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण  वाडी शेवाळे येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. रेखाबाई नंदू पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



 यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश एकनाथ पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात बापूसाहेबांच्या जलसंधारण, सामाजिक शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याला उजाळा देऊन समस्या सोडवताना गोरगरीब जनतेस कशाप्रकारे न्याय मिळवून दिला. बापू साहेबांचा स्वप्न साकार करण्यात आम्ही प्रयत्नशील असून वेगाने उद्दिष्ट साध्य करीत आहोत असे सांगितले. 



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू पाटील  यांनी केले तर आभार  बापूसाहेबांचे नातू जयदेव पाटील यांनी मानले कार्यक्रमाला विशेष सहकार्य विकास सोसायटी चेयरमन रमेश पाटील , उपसरपंच सोपान बाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, सौ. संध्या पाटील, लताबाई पाटील, सीमा पाटील, प्रवीण पाटील, पोलीस पाटील संजय बाबुराव पाटील, सोसायटी चेअरमन रमेश पाटील, डॉ. एल टी पाटील, डॉ. शेखर पाटील, गणेश पाटील, सुभाष पारखे, पुंडलिक पाटील, रवींद्र पाटील, भिवसन पाटील, भगवान पाटील यावेळी गावातील नागरिक ,तरुण

व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..