महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार अध्यक्षपदी श्री.शशिकांत दुसाने.

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 
महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय मानव अधिकार अध्यक्षपदी श्री.शशिकांत दुसाने.
कार्यकारी संपादक :-राकेश सुतार 
पाचोरा : प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) या मानवाधिकार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. दिलीप मोहिते सर यांचे आदेशाने व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा (महिला विंग) यांच्या शिफारसीने श्री. शशिकांत त्रंबक दुसाने (लासगाव, ता.पाचोरा जि. जळगाव येथील) यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या पदी नियुक्ती करण्यात आली. श्री. शशिकांत दुसाने यांचा विस्तार युक्त समाजसेवेचा आढावा घेऊन ही नियुक्ती करण्यात आली. श्री.शशिकांत दुसाने यांचे राष्ट्रीय कार्यकारिणी तर्फे शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. श्री दुसाने यांच्या नियुक्ती बद्दल सहकारी, नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्टांकडून प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!

आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.