खरिपाच्या पीकविम्याची अखेर मुदत संपली...मात्र संकेतस्थळ सुरु असल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला ...
सोयगाव प्रतिनिधी :-
खरिपाच्या पीकविम्याची अखेर मुदत संपली...मात्र संकेतस्थळ सुरु असल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला ...
सोयगाव,दि.०२...खरिपाच्या पिक विम्यासाठी शासनाने सोमवारी दि.०१ वाढीव बोनस दिवस म्हणून संकेतस्थळ सुरु ठेवले मात्र मंगळवारी पिकविम्याचे संकेतस्थळ सुरु असून रक्कम मात्र कपात होत नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला असतांना महसूल आणि कृषी विभागांनी पिकविम्याच्या मुदत वाढी बाबत अद्यापही कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नसल्याचे सांगून पीकविमा मुदत संपल्याच्या बाबीला दुजोरा दिलेला आहे मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत संकेतस्थळ सुरु होते त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली मात्र यामध्ये खरिपाच्या पिकांच्या संरक्षित रक्कम कपात होत नसल्याने संभ्रम वाढला होता.
खरिपाच्या पिकविम्यासाठी शासनाने दि .३१ जुलै पर्यंत अंतिम मुदत दिली होती परंतु (दि.३१) जुलैला रविवार असल्याने शेतकऱ्यांना वाढीव दिवस म्हणून सोमवारी पीकविमा भरता आलेला आहे परंतु पुन्हा मंगळवारी संकेतस्थळ सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली खरी परंतु पिकांच्या संरक्षित पोटी भरणा केल्या जाणाऱ्या रक्कम कपात होत नसल्याने संभ्रम वाढला होता.खरिपाच्या पीकविमा काढण्यासाठी शासन स्तरावरून दि.१४ जुलै पासून प्रारंभ करण्यात आला होता परंतु पिकविम्याच्या कालावधीत तब्बल दहा दिवस सतत रिमझिम पावूस झाल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेला दहा दिवस अल्प प्रतिसाद दिला मात्र मुदतीच्या शेवटच्या तीन दिवस शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढलेला असतांना अंतिम मुदतीच्य दिवशी रविवार असल्याने सोमवारी दि.०१ मध्यरात्री पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली होती मंगळवारी मात्र संकेतस्थळ सुरु असल्याने पुन्हा शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली परंतु संरक्षित रक्कम कपात होत नसल्याने केवळ संकेतस्थळ सुरु ठेवून शेतकऱ्यांचा संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
-------अंतिम मुदतीच्या तीन दिवसात ६० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून मागील खरिपाच्या हंगामाप्रमाणे या हंगामातही खरिपाच्या पिक विम्याला मुदत वाढ मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परंतु यंदाच्या हंगामात केवळ एकच दिवस मुदतवाढ मिळाली असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
Comments
Post a Comment