पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे पोलीस जनता दरबाराचे आयोजन..

दिपक मुलमुले 9595470800

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे पोलीस जनता दरबाराचे आयोजन...

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे पोलीस जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी १२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला अशी माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे सर  यांनी दिली.
राज्यातील प्रत्येक पोलीस विभागीय क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करून नागरीकांच्या तक्रारी त्वरीत मार्गी लावाव्यात असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनीवारी जनता दरबारचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आले आहे. जळगाव पोलीस विभागातील  तालुका पोलीस ठाण्याच्या ग्रामीण भागातील पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन,येथे  नागरीकांसाठी २ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान 'जनता दरबार'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 12 तक्रारींचा निपटारा करण्यात आला अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे सर यांनी दिली.नागरीकांच्या कौटुंबिक, शेतीचा वाद, सामाईक भिंतचा वाद, शेतातच्या बांधावरील वाद देखील तातडीने सोडविण्याच्या सुचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे,पो.हे.को. माळी दादा,पो.ना. शिवनारायण देशमुख.पो.हे.को.राकेश खोंडे,पो.हे.को. पांडुरंग गोरबंजार,पो.को.ज्ञानेश्वर बोडखे पो.को.दिपक पाटील,पो.को.मुकेश लोकरे,पो.को पंकज  सोनवणे,
पो.को.दिपक बडगुजर,पो.को.संभाजी सरोदे,पो.को.अमोल पाटील,पो.को.प्रमोद वडीले चालक दिपक अहिरे,
म.पो.शि.योगिता चौधरी,म.पो.शि.भावसार ताई 
शिपाई सागर सावळे,व पोलीस ठाण्याचे ठाण्याचे पोलीस अधिकारी  कर्मचारी तसेच पिंपळगाव हरे परिसरातील गावामंधील सरपंच, उपसरपंच,सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार दिलीप जैन,पत्रकार बांधव,व तरुण वर्ग  उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..