ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे डॉ.रोशन राजपूत व डॉ.विनोद पाटील रुजू...
Deepak Mulmule 9595470800
ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव हरे. येथे डॉ.रोशन राजपूत व डॉ.विनोद पाटील रुजू...
पिंपळगाव हरे येतील ग्रामीण रुग्णालयात तीन एम.बी.बी.एस.डॉक्टर जळगाव येथील सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांनी यांची नियुक्ती केली आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर नसल्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत होते याची माहिती पिंपळगाव येथील देशदूत चे पत्रकार दिपक मुलमुले यांना मिळाली असता त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र राज्य माळी समाज प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर यांना जाऊन सांगितले असता त्यांनी दोघानीं जाऊन जळगाव येथे सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन पिंपळगाव हरे येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी केली असता त्यांची मागणी लवकरच मान्य करून 20 जून सोमवार रोजी डॉ.कुंदन वाघ यांची पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली .तसेच त्या नंतर अजून दोन डॉक्टर डॉ.रोशन राजपूत एम.बी.बी एस.जामनेर व डॉक्टर विनोद पाटील एम.बी.बी.एस पाचोरा यांची पिंपळगाव हरे येथील ग्रामीण रुग्णालयाला नियुक्त्या करण्यात आल्या आहे.सिव्हिल सर्जन यांनी पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाची तात्काळ दखल घेऊन डॉक्टरांची नियुक्ती केली त्या मुळे गावातील ग्रामस्तानतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
तिघ डॉक्टरांनी गावातील जनतेला चांगल्या प्रकारे सेवा देऊन मागील असलेलं डॉक्टर निलेश पवार व डॉक्टर दिपक पवार यांच्या प्रमाणे आपल्या कामाचा ठसा उमटविला पाहिजे असे असे जनसामन्यातून म्हटले जात आहे.

Comments
Post a Comment