नागपंचमी दिवशी सापाला दूध पाजू नका सापाबद्दल श्रद्धा असावी अंधश्रद्धा नको.

नागपंचमी दिवशी सापाला दूध पाजू नका सापाबद्दल श्रद्धा असावी अंधश्रद्धा नको.
श्रावण महिना सुरू झाला की, अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागपंचमी मराठी माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. असं मानलं जातं की, या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे.
आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमी विषयी माहिती (Nag Panchami Mahiti) वाचल्यास तुम्हाला कळेल की, फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे असेही सर्पमित्र दिनेश गायकवाड यांनी सांगितले..
नागाच्या प्रतिकात्मक चित्राची पूजा केली जाते. तसेच वारुळावर जाऊन दूध, लाह्या हळदी-कुंकू वाहिल्या जातात; परंतु कुणीही नाग, सापाचा खेळ केला किंवा त्यावर पैसे कमाविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी वन विभागाची पथके तैनात आहेत.
शहरात वारूळ दिसत नाहीत. त्यामुळे नागाची प्रतिकृती असलेल्या फोटोची पूजा केली जाते. सापाना घेऊन खेळ मांडणाऱ्यांवर वन विभागाचे पथक लक्ष ठेवणार आहे. कुणी  प्रयत्न केल्यास तो दंडास आणि गुन्ह्यास पात्र ठरणार आहे. वन विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पथके नियुक्त केली आहेत, असे वन विभागाचे अधिकारी अभिजीत मुलाने यांनी सांगितले.
हि घ्या खबरदारी उपचार.
अंधश्रद्धेतून पूजा करू नका, सापाला हाताळू नका, 
सापांची स्मरणशत्की विकसित झालेली नाही त्यामुळे साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही,
 बाबा बुवांकडून उपचार न करता 
पहिले प्रथमोपचार घ्यावा,व
जिल्हास्तरीय सरकारी रुग्णालय गाठावे साप चावलेल्या माणसाला सर्प प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. असे 
 वन्यजीवप्रेमी मनोज गायकवाड यांनी सांगितले.

साप दूध पितो का?
साप हा सस्तन प्राणी नाही. दूध हे  सस्तन प्राण्यांचे अन्न आहे 
सरपटणाऱ्या प्राण्यांचे नाही
प्राण्यांचे अन्न आहे. सरपटणाऱ्या प्राण्याचे नाही,
 सापाच्या अंगावर केस असतात का?
 साप हा सस्तन प्राणी नाही. सस्तन प्राण्याच्याचे
अंगावर केस असतात.हळदी-कुंक त्याच्या शरीरासाठी अपायकारक असून, त्वचा खराब होऊन त्याचा मृत्यू होतो. 
सापाचद्दल या सर्व अंधश्रद्धा अशा.... सापाच्या डोक्यावर मणी असतो, सापाला केस असतात. साप धनाचे रक्षण करतो साप पाठलाग करतो, साप पुंगीवर नाचतो, साप बदला घेतो, साप दूध पितो, विशिष्ट प्रकारच्या सापांमुळे धनलाभ होतो.
असे सापाबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा आहेत.
साप हा शेतकऱ्यांचाखरा मित्रच.
साप हा शेतकयांचा खरा मित्र मानला जातो. तो खऱ्या अर्थाने उपद्रवी असलेल्या उंदरासारख्या प्राण्यांचा नायनाट करतो  व पर्यावरण समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. नागपंचमीला शेतात नांगरदेखील चालवित नाहीत. साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही. साप बदला घेत नाही.
हे आहेत महाराष्ट्रातील प्रमुख विषारी साप. 

Comments