माणुसकी समूहाने पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी येरवडा येथे केले दाखल...

माणुसकी समूहाने पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण महिलेला पुनर्वसनासाठी येरवडा येथे केले दाखल...

पडेगाव येथे राहणाऱ्या एक मानसिक रुग्ण महिलेने क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अक्षरश  धुमाकूळ घातला होता. तेथील जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना शिवीगाळ करणे,आरडाओरडा करणे, त्यांचा चावा घेणे आणि रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणे अशा संदर्भातली तक्रार स्थानिक  नागरिकांकडून क्रांती चौक पोलिसांना प्राप्त झाली होती. तेव्हा तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी सदर महिलेची रवानगी छावणी पोलीस स्टेशन येथे केली. तिथे त्या महिलेची चौकशी केल्या असता तिला एक मुलगी असून ती मानसिक रुग्ण असल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिलेला आहे. तिला वडील आणि भाऊ आहेत. तिची आई ही वारलेली आहे. ती सध्या पडेगाव येथे वडिलांच्या सोबत राहते. तिने छावणी पोलीस स्टेशन येथे  प्रचंड धुमाकूळ घातला. तेथील पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था आणि माणुसकी समूहाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडित यांना ही बाब सांगितली. त्यानंतर सुमित पंडित यांनी पोलिसांच्या मदतीने सदर महिलेला घाटी रुग्णालयात आणून तिथे मानसोपचार विभागात डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी ती मानसिक रुग्ण आहे म्हणून सांगितले. तसेच तिच्या काही वैद्यकीय चाचण्या घेतल्या. पोलिसांच्या मार्फत  न्यायालयासमोर तिला दाखल करण्यात आले.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्ट नंबर 16, औरंगाबाद शहर यांनी तिच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून तिला पुनर्वसनासाठी आणि पुढील औषध उपचारासाठी मानसिक रुग्णालय येरवडा पुणे येथे दाखल करण्याचे आदेश दिले. माणुसकी समूहाने ह्या महिलेला छावणी पोलीस स्टेशन येथील पोलिसांच्या मदतीने येरवडा पुणे येथे दाखल केले. यासाठी पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागिले, पोलीस उपनिरीक्षक डाके, अवघड,प्रीती फड, पोलीस हवालदार दिलीप जाधव, मंगेश शिंदे, मीना जाधव, माणुसकी समूहाचे सुमित पंडित पूजा पंडित, बोधि संस्थेचे डॉ रंजना दंदे यांचे या कामी सहकार्य लाभले.
 
*मनोरुग्णांसाठि काम करणे सोपे नाही माणुसकी समुहाची पोलीसांना होतीय मदत..*
 याप्रकरणी पोलीस निरीक्षक छावणी पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, औरंगाबाद शहरांमध्ये मनोरुग्ण तसेच सिग्नलवर किंवा विविध भागांमध्ये भीक मागणारे यांचे प्रमाण सध्या खूप वाढलेले आहे. दोन वेळचे जेवण फुकट मिळते म्हणून बऱ्याचशा लोकांना घाटी रुग्णालयामध्ये पण आणून सोडल्या जात आहे. आज आपण एवढ्या विकासाच्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी करत असताना,अशा घटना माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. तसेच माणसांमधला माणुसकीचा झरा आटत चाललाय असे दिसते.देशमाने साहेब असे म्हणाले की, स्वतः यांची जवळचे नातेवाईक यांना रस्त्यावर सोडून देतात आणि यांना बेघर, बेसहारा करतात. एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातल्या घटकांनी समोर येऊन या लोकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली पाहिजे.

-------पोलीस निरिक्षक कैलास देशमाने छावणी पोलीस स्टेशन

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.