Viral Video: लग्नात स्पार्कल गनने स्टंटबाजी पडली महागात; वधूच्या चेहऱ्याजवळ झाला स्फोट.
Viral Video: लग्नात स्पार्कल गनने स्टंटबाजी पडली महागात; वधूच्या चेहऱ्याजवळ झाला स्फोट. https://youtube.com/shorts/EcUK-fq5jQE?feature=share आपले लग्न अविस्मरणीय व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकजण आपले लग्न खास बनवण्यासाठी विविध प्रयत्न करतात, पण कधी कधी अशा घटना घडतात, ज्याचा विचार करुनही मनात भीती वाटते. आजकाल लग्न आणि प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये स्टंटबाजी हा ट्रेंड बनला आहे. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ सिद्ध करतो की, असे स्टंट नेहमीच सुरक्षित असू शकत नाहीत. वधूसोबत घडली धक्कादायक घटना... व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू स्पार्कल गनसह पोज देताना दिसत आहे. पण, काही क्षणातच बंदुकीचा स्फोट होतो आणि थेट वधूच्या चेहऱ्यावर आगीचा लोळ आदळतो. घाबरलेली वधू किंचाळते आणि बंदूक फेकून देते. त्यानंतर आजूबाजूचे लोक वधूच्या मदतीसाठी धावतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर @Sassy_Soul_ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या क्लिपवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'आजकाल लोकांना काय झालंय...