श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या "भोजे" ता. पाचोरा* येथे नवीन साप्ताहिक सेवा केंद्राची सुरुवात......

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या "भोजे" ता. पाचोरा* येथे नवीन साप्ताहिक सेवा केंद्राची सुरुवात......
➡️जळगाव येथील कृषी मेळाव्यात  गावातील काही भावीक आले होते. तेथील सेवेकरी ग्रामसेवक आप्पा श्री. एल. एन. पाटील साहेब यांनी या गावात केंद्र सुरू व्हावे ही इच्छा बोलून दाखवली होती.
 त्यानंतर काल *दिनांक 18 ऑक्टोंबर 2022* रोजी पाचोरा येथून श्री. एल. एन. पाटील साहेब, श्री. सुभाषदादा पाटील , श्री .सुवर्णसिंग राजपूतसर श्री. अंबालाल पवार सर, श्री.मनीष बाविस्कर सर "भोजे" येथे जाऊन आले.. मार्गाची ओळख उपस्थित भाविक यांना करून दिली. गावातील भाविक, सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी केंद्र सुरू करावे अशी ईच्छा व्यक्त तर केलीच आरती साठी लागणारी जागा  शेड असणारी व ओटा असणारी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. 
➡️ *उद्या 20 ऑक्टोबर 2022(गुरूवार)* रोजी "भोजे" गावात मारुती मंदिराच्या समोरील शेडमध्ये प्रश्नोत्तर सेवा व मार्गदर्शन सेवा *ठीक 7 वाजता संध्याकाळी* होणार आहे.( विनंती आपल्या ओळखीचे नातेवाईक मित्र जर या गावात राहत असतील तर त्यांना उद्या आवर्जून उपस्थित राहण्यासाठी सांगावे.)
➡️ भोजे गावातली संपूर्ण मंडळी दिवाळी झाल्यावर बरोबर परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरी व गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहेत.
➡️साप्ताहिक नियमित आरती दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता श्री. मारुती मंदिराच्या पटांगणात शेडमध्ये सुरू होईल.. उद्या प्रश्न उत्तर व मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. तरी आपल्या संबंधित सर्व भोजे व चिंचपुरे गावातील भाविक सेवेकऱ्या पर्यंत हा निरोप द्यावा ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.