लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार. पाचोरा तालुक्यातील छोट्याशा कुऱ्हाड गावात जन्मलेल्या लेखणीच्या शीलेदाराचा आज वाढदिवस ते म्हणजे दैनिक लोकमत चे पत्रकार सुनील भाऊ लोहार. लोहार प्रवर्ग म्हणजे आठवतो तो पारंपरिक व्यवसाय ,आजच्या काळाच्या ओघात तो पण नष्ट होण्याच्या मार्गावर,परंतु येथे अपवाद आहे,तो म्हणजे अत्यंत गरिबीच्या कुटुंबात जन्मलेल्या,घरात अठरा विश्व दारिद्य्र, त्यावेळेस घरात खायला, अंगावर कपडे नाही वडिलांनी काबाडकष्ट करून जेमतेम संसाराचा गाडा ओढला,सुनील भाऊ चां परिवार म्हणजे दोन भाऊ व एक बहिण असा परिवार असून ,वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती करून ,त्याला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायात इमानदारीने काम करून त्यात अनेक उत्पादने जसे की विला ,केळी कापण्याची दराती , बक्खी,अडकित्ता ,कुऱ्हाड वगैरे अवजारांना चांगल्या पद्धतीने धार देऊन या अवजारणा महाराष्ट्रभर मागणी मिळून दिली. सुनील लोहार यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले असून त्यांनी नोकरीच्या मागे लागता आपल्या व्यवसायाकडे वळले.या...
Comments
Post a Comment