जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटकांनी बहरली.....सोयगाव आगारालाएकाच दिवसात दोन लाख रु.चे उत्पन्न..

मुख्य संपादक :-दिपक मुलमुले 
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटकांनी बहरली.....सोयगाव आगाराला दोन लाख रु चे उत्पन्न
सोयगाव तालुका विशेष प्रतिनिधी
  (बाळू शिंदे,सोयगाव)
सोयगाव,( जि. औरंगाबाद)दि.८
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने  जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत दि ५ ते दु.१५ पर्यंत मोफत प्रवेशाची घोषणा झाल्याने रविवारी दि.७ जवळपास पाच हजार पर्यटकांनी जगप्रसिबद्ध अजिंठा लेणीचा भेट दिली त्यामूळे रविवारी दुपार पर्यंत जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसर पर्यटकांनी गजबजून जाऊन बस तिकीटासाठी  पर्यटकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.दरम्यान,अजिंठा लेणीत पर्यटकांना घेऊन धावणाऱ्या सोयगाव आगाराला रविवारी एकाच दिवशी दोन लक्ष रु चे उत्पन्न मिळाल्याने सोयगाव आगाराला उत्पन्नात लॉटरी लागली आहे.
शुक्रवार पासून अजिंठा लेणीत पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे रविवारी अजिंठा लेणीत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते.रविवारी दुपारपर्यंत जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या भेटीवर  येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीने टि.पॉइंट व अजिंठा लेणी परिसर गजबजून जाऊन बसचे तिकीट मिळविण्यासाठी लेणीत व फर्दापूर टि.पॉइंट येथे पर्यटकांच्या लांबच लांब रांगा होत्या.अजिंठा लेणी भेटीवर येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढतच जात असल्याने रविवारी अनेक पर्यटकांनी फर्दापूर टि पॉइंट ते अजिंठा लेणी आणि व्ह्यू पॉइंट ते अजिंठा लेणी असा पायी प्रवास केल्याचे दिसून आले आहे.यावेळी फर्दापूर टि.पॉइंट येथील वाहनतळ ही पर्यटकांच्या गाड्यांनी फुल झाले होते. दरम्यान अजिंठा लेणी भेटीवर आलेल्या पर्यटकांना व्यवसस्थित वाहतूक सेवा पूरविता यावी म्हणून सोयगाव आगाराने अजिंठा लेणीत १३ बस १३ चालक  ८ वाहक यांच्या सह सोयगावचे आगार प्रमुख स्वता असे २२ कर्मचारी अजिंठा लेणीत उपस्थिती ठेवले होते.दरम्यान १५ ऑगस्ट पर्यंत अजिंठा लेणीत पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याने १५ ऑगस्ट पर्यंत दरोज अजिंठा लेणी पर्यटकांच्या गर्दीने गजबजून जावून येथील येथील पर्यटनाला सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसत  आहे तसेच फर्दापुर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे  यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी यांनी चोक बंदोबस्त ठेवला
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची वाहतुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या सोयगाव आगाराच्या तेरा बसेसच्या माध्यमातून अजिंठा लेणीत 350 फेऱ्या मधून एक हजार पाचशे पाच की मी अंतर कापून तब्बल दोन लक्ष २१ हजार ५५५ इतके उत्पन्न विक्रमी उत्पन्न मिळविले आहे या वर्षातील एकाच दिवसात सोयगाव आगाराचे हे विक्रमी उत्पन्न असल्याचे सांगण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.