सोयगाव पंचायत समिती गणांसाठी सोयगावला आक्षेप निरंक.....तहसीलदार रमेश जसवंत यांची माहिती..

  सोयगाव,प्रतिनिधी दि.०२...बाळू शिंदे सोयगाव....

सोयगाव पंचायत समिती गणांसाठी सोयगावला आक्षेप निरंक.....तहसीलदार रमेश जसवंत यांची माहिती..

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवारी गणांसाठी आक्षेप व हरकती साठी अंतिम मुदत होती.परंतु सोयगाव तालक्यातील सहाच्या सहा गणांसाठी एकही आक्षेप व हरकती प्राप्त झालेल्या नसल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.त्यामुळे सोयगाव पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणाची स्थिती कायम राहण्याची स्थिती आहे.

   सोयगाव पंचायत समितीच्या सहा गणांसाठी आरक्षण व सोडत दि.२८ काढण्यात आली होती या सोडतीवर हरकती व आक्षेपांसाठी दि.२९ ते दि.०२ कालावधी दिलेला असतांना मंगळवारी दि.२८ सहा गणांसाठी एकही आक्षेप व हरकती प्राप्त झालेल्या नसल्याने यावर आता दि.०५ आगस्तला सुनावण्या होण्याची मुदत होती परंतु सोयगाव पंचायत समिती आरक्षण व सोडतीवर एकही आक्षेप व हरकती प्राप्त झालेल्या नसल्याने सोयगाव पंचायत समितीचे आरक्षण व सोडत कायम राहण्याची चिन्हे आहे.त्यामुळे आता इच्छुकांनी किल्ले बांधणीला प्रारंभ केला आहे.सोयगाव पंचायत समितीसाठी आमखेडा,निंबायती,सावळदबारा,बनोटी,फर्दापूर आणि गोंदेगाव अशी सहा गण आहेत या सहा गणांसाठी तब्बल ८० हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी जाहीर झालेली आरक्षण व सोडत कायम राहण्याची चिन्हे आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात पंचायत समिती निवडणुकांसाठी चुरस वाढणार आहे.सहा गनांपैकी बनोटी –सर्वसाधारण महिला,सावळदबारा-अनुसूचित जाती महिला, आमखेडा-अनुसूचित जमाती महिला राखीव झालेल्या असल्याने उर्वरित तीन गणांसाठी निंबायती-सर्वसाधारण साठी असल्याने या पंचायत समिती गणात उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच पहावयास मिळणार असून या गणात इच्छुकांची गर्दी वाढती झालेली आहे. गोंदेगाव गण ओ.बी.सी पुरुषसाठी राखीव झाल्याने या गणातही उमेदवारीपासून ते निवडणुकीपर्यंत चुरस राहण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे फर्दापूर गण सर्वसाधारण साठी अनारक्षित असल्याने फर्दापूर गणातही इच्छुकांची संख्या मोठी झालेली असल्याने राजकीय पक्षांना उमेदवार चाचपणी साठी कोडे पडले आहे.या व्यतिरिक्त सोयगाव तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषदेचे गट अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले आहे त्यामुळे या गटातून इच्छुकांनी पाठ फिरविली असल्याने गटांचे इच्छुकांना गणात तहान भागवावी लागणार आहे.

---पंचायत समिती गणांचे आरक्षण खालीलप्रमाणे---आमखेडा-अनुसूचित जमाती महिला

निंबायती-सर्वसाधारण  बनोटी –सर्वसाधारण महिला

सावळदबारा-अनुसूचित जाती महिला

गोंदेगाव-ओ.बी.सी पुरुष

फर्दापूर-सर्वसाधारण अनारक्षित

बनोटी –सर्वसाधारण महिला

सावळदबारा-अनुसूचित जाती महिला

-----जिल्हा परिषदेच्या तीनही गटांचे अनुसूचित जाती साठी आरक्षित झाले असून आमखेडा-अनुसूचित जाती-पुरुष बनोटी-गोंदेगाव –अनुसूचित जाती-सर्वसाधारण,आणि फर्दापूर-अनुसूचित जाती महिला याप्रमाणे आहेत

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.