पिंपळगाव हरे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी..

मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 
पिंपळगाव हरे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी..

आज दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी खाजगी प्राथमिक विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती नंदिनी वाघ मॅडम या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली, कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती नंदिनी वाघ मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री शशिकांत महालपुरे सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन केले.
यानंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री प्रमोद मस्कावदे सर तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमांचे पूजन केले! यानंतर आमच्या शाळेतील इ. 1 ली ते 4 थी च्या चिमुकल्यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर छान छान भाषणे केलीत!
यानंतर शिक्षकवृंदांमधून श्रीमती अनिता जाधव मॅडम, श्रीमती मीना मोरे मॅडम, श्री दीपक महाजन सर, श्रीमती नंदिनी वाघ मॅडम यांची भाषणे झालीत. आभार श्री प्रशांत चौधरी सर यांनी मानले व कार्यक्रमाचा शेवट झाला...!!यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्तित होता... 

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.