रेल्वेखाली चिरडून एका ४९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू.


 मुख्य संपादक दिपक मुलमुले 9595470800

रेल्वेखाली चिरडून  एका ४९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू.
आपल्या नणंदेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन पुण्याहुन पाचोरा येथे महाराष्ट्र एक्सप्रेसने परतलेल्या पाचोरा येथील एका ४९ वर्षीय महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक १७ जुलै रविवार रोजी सकाळी ६:५० वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील मुळचे रहिवासी व हल्ली मुक्काम पाचोरा शहरातील भडगाव रोड स्वामी लॉन्स परिसरातील रहिवासी सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्या पत्नी सुनिता सुरेश पाटील ह्या चार दिवसांपूर्वी आपल्या तीन जावांसह पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नणंदेच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या.
दरम्यान ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन दिनांक १६ जुलै शनिवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोल्हापूरहुन गोंदिया कडे जाणाऱ्या डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस (क्रंमाक ११०३९) ने पाचोरा येण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान दिनांक १७ जुलै शनिवार रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस ही सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर एक्स्प्रेसच्या शेवटी असलेल्या महिला राखीव जनरल डब्यात बसलेल्या तीन जावा व सुनिता पाटील ह्या प्लॅटफार्मवर उतरल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या मागुन अप लाईन क्रॉस करुन जात असतांना तीन जावा ह्या दुसऱ्या साईडच्या अपसाईडच्या प्लॅटफार्म वर चढल्या. दरम्यान सुनिता पाटील यांच्याकडे बॅगांचे ओझे होते. याच वेळी दिल्लीहुन मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस ( क्रंमाक २२२२२) ही भरधाव वेगाने येत असल्याचे सुनिता पाटील यांच्या लक्षात येताच त्यांची भंबेरी उडाली.
हा प्रकार लक्षात येताच राजधानी एक्सप्रेसच्या लोकोपायलट ने जोरात हॉर्न वाजवुन तसेच गाडी हळु करण्यासाठी ब्रेक देखील दाबला मात्र राजधानी एक्सप्रेस सुसाट वेगाने असल्याने लोकोपायलट यांचाही प्रयत्न व्यर्थ ठरला. नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. क्षणाताच सुनिता पाटील ह्या राजधानी एक्सप्रेसखाली सापडुन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र पाचोराचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे त्यांच्या पथकासह पोहचुन पंचनामा केला. तसेच सुनिता पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील व बबलु मराठे यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
मयत सुनिता सुरेश पाटील यांच्या पाश्चात्य पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा रेल्वे स्टेशनचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

Comments

  1. अत्यंत दुर्देवी घटना... परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.