अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..
पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन चे पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान पकडले पीकअप चोरी करणारे आरोपीतास ताब्यात घेवुन चोरीची 2,50,000/- किंमतीची महेद्र पीकअप घेतली ताब्यात..
पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 27/07/2024 रोजी पोना/1281 दिपक पिताबर पाटील, पोकॉ/2444 अमोल सुरेश पाटील असे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या आदेशान्वये पिंपळगांव हरेश्वर गांवात पेट्रोर्लीग करित असतांना पिंपळगांव हरेश्वर गांवातील माळी समाज मंगल कार्यालय येथे एक महिंद्रा कंपनीची पीकअप गाडी क्र. MH 46 E 4353 हि संशयीत रित्या जात असतांना दिसल्याने त्यास त्यांनी थांबवुन सदर त्यावरील चालकास खाली उतखुन त्यास त्याचे नाव व वाहनाचे कागदपत्र विचारले असता त्यांने उडवीउडवीचे उत्तर देत असल्याने त्यास सदर पिकअप सह पोलीस स्टेशनला आणुन त्यास विश्वासात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने त्यांचे नाव शेख अरबाज शेख जलीम, वय 20 वर्ष, रा. डायमंड आइस डेपो जवळ, एस.टी. कॉलनी, फाजीलपुरा, छत्रपती संभाजी नगर, ता.जि. छत्रपती संभाजी नगर असे सांगुन त्यांच्या ताब्यातील महेद्रा पीकअप गाडी क्र. MH 46 E 4353 हि हरसुल, ता. जि. छत्रपती संभाजी नगर येथुन चोरी करुन आणल्याबाबत सांगितल्याने व त्याच्या ताब्यात खालील वर्णनाचे वाहन मिळुन आले ते पाहता त्याचे वर्णन खालील प्रमाणे,
1) 2,50,000/- रु.कि.ची. एक पांढ-या रंगाची महेद्रा पीकअप तीचा क्र. MH 46 E 4353 असा असुन तीचा चेचीस नंबर - MA12P2GLKD1C29702 व इंजिन नं. GLD1C50582 अशी तीला मागे मालवाहतुक साठी असी ट्रॉली कॅबीन अशी जु.वा.कि.अ.
वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आल्याने पिंपळगांव हरेश्वर पो.स्टे.ला गुरन 185/2024 महा.पो.अधि.क. 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हाचा पुढील तपास पोहेकॉ/1489 अतुल पवार करित आहे.
सदर वाहन चोरीबाबत बेगमपुरा पोलीस स्टेशन, जि. छत्रपती संभाजी नगर येथे गुन्हा दाखल असुन पुढील योग्य कार्यवाही करित आहोत.
सदरची कामगीरी मा.डॉ. महेश्वर रेड्डी सो., पोलीस अधिक्षक, जळगांव, मा.श्रीमती कविता नेरकर सो., अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, मा. श्री. धनंजय येरुळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग, याच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश काळे, पोहेकों/1489 अतुल पवार, पोना/1281 दिपक पाटील, पोकॉ/2444 अमोल पाटील, पोकों/1341 अभिजीत निकम अशांनी केली आहे.
Comments
Post a Comment