पोलीस प्रशासनाने केली अनाथांची दिवाळी गोड...
पोलीस प्रशासनाने केली अनाथांची दिवाळी गोड
आपल्या पाचोरा शहरात गेल्या पाच वर्षापासून भागवताचार्य योगेश जी महाराज व ह भ प सौ सुनीता ताई पाटील यांच्या माध्यमातून वारकरी भवन म्हणजे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय येथे शिक्षण घेत असलेल्या अनाथ व गोरगरिबांच्या मुलांची दिवाळी यावर्षी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक आदरणीय श्री राहुल खताळ साहेब यांच्या माध्यमातून मुलांची दिवाळी गोळ करण्यात आली
आपल्या पाचोरा शहरात कोरोना काळाच्या अगोदर पासून काही अनाथ गोरगरिबांच्या मुलांसाठी एक निवासी वारकरी पाठशाळेची सुरुवात झाली होती आणि गेल्या पाच वर्षापासून तिथे मुलांना संस्काराची धडे गिरविले जात आहेत दरवर्षी मुलांची आध्यात्मिक जडणघडण होत असते सदर पाठशाळेमध्ये मुले व मुली दोघे शिक्षण घेत आहेत दोघांचे संगोपन महाराज व त्यांच्या धर्मपत्नी यांच्या माध्यमातून होत असते
पूर्वीही पाठशाळा एका भाड्याच्या घरात सुरू होती परंतु काही काळानंतर शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री रमेश जी मोर यांच्या माध्यमातून पाठशाळेला जमीन दान देण्यात आली आणि तिथे आज एक भव्य वस्तू उभी झालेली आहे दरवर्षी दिवाळीला ज्या मुलांचे आई-वडील नातेवाईक आहेत त्या मुलांना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जातात पण असेही काही मुलं आश्रमात आहेत की त्यांचं कोणीही नाही आणि मग अशा मुलांसाठी आई-वडील हे महाराज आणि ताई दोघेच आहेत आणि या मुलांची दिवाळी ते दोघे पती-पत्नी करत असतात
महाराज वर्षभर शिवपुराण राम कथा भागवत कथेच्या माध्यमातून जो पैसा उभा राहील त्या पैशातून ही पाठशाळा चालवत असतात व सौ ताई देखील आपल्या कीर्तनातून येणारा पैशातून पाठशाळेची उपजीविका भागवत असतात त्यात प्रामुख्याने शहरातील काही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक दिवसाचा जेवणाचा खर्चही दिला जातो
दिवाळी आहे म्हणून सर्व मुलांना आनंद घेता यावा म्हणून महाराज आणि ताई यांनी दोघांनी काही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सर्व मुलांना नवीन कपडे देखील घेतले तसेच मुलांसाठी गोड पदार्थ असतील अनेक गोष्टी उपलब्ध केल्या या सर्व गोष्टीची माहिती जेव्हा पाचोरा शहरातील पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक आदरणीय श्री राहुल खताळ साहेब यांना झाली तेव्हा आदरणीय राहुलजी खताळ साहेब यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत येऊन मुलांसाठी मिठाई फळे फटाक्याचे बॉक्स आधी करून सर्व गोष्टी आणून स्वतः मुलांसोबत या सर्व गोष्टींचा आनंद घेतला तसेच कार्याचे कौतुक करताना म्हणाले की या जगात सुद्धा काही परोपकारी लोक आहेत ज्यांच्यामुळे हे सर्व कार्य चालू आहेत आणि तुम्ही वारकरी मंडळी म्हणजे पोलिस च आहात जे समाजातील वाईट गोष्टींवर भाष्य करून लोकांना त्याच्यापासून दूर करतात लोकांना योग्य मार्ग दावतात तसेच मुलांना देखील साहेबांनी वेळोवेळी अभ्यास कसा करावा वारकरी अभ्यास तसेच शालेय अभ्यास या दोघांची सांगड कशी घालावी याबाबतीत योग्य असे मार्गदर्शन केले आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आदरणीय योगेश जी महाराज व ताई यांच्या हातून करण्यात आले अशा पद्धतीने सर्व पोलीस प्रशासनाचे योगेश महाराज यांनी आभार मानले व असेच वेळोवेळी सहकार्य असावे अशी अशा व्यक्त केली
आदरणीय राहुल खताळ साहेब यांच्या सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय श्री मोरे साहेब तसेच समीर दादा पाटील सुनील पाटील योगेश पाटील राहुल बेहरे विनोद बेलदार प्रकाश पाटील जितेंद्र पाटील प्रकाश शिवदे अमोल पाटील आधी करून सर्व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते
Comments
Post a Comment