लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.
लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.
पाचोरा तालुक्यातील छोट्याशा कुऱ्हाड गावात जन्मलेल्या लेखणीच्या शीलेदाराचा आज वाढदिवस ते म्हणजे दैनिक लोकमत चे पत्रकार सुनील भाऊ लोहार.
लोहार प्रवर्ग म्हणजे आठवतो तो पारंपरिक व्यवसाय ,आजच्या काळाच्या ओघात तो पण नष्ट होण्याच्या मार्गावर,परंतु येथे अपवाद आहे,तो म्हणजे अत्यंत गरिबीच्या कुटुंबात जन्मलेल्या,घरात
अठरा विश्व दारिद्य्र, त्यावेळेस घरात खायला, अंगावर कपडे नाही वडिलांनी काबाडकष्ट करून जेमतेम संसाराचा गाडा ओढला,सुनील भाऊ चां परिवार म्हणजे दोन भाऊ व एक बहिण असा परिवार असून ,वडिलांच्या पारंपरिक व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती करून ,त्याला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायात इमानदारीने काम करून त्यात अनेक उत्पादने जसे की विला ,केळी कापण्याची दराती , बक्खी,अडकित्ता ,कुऱ्हाड वगैरे अवजारांना चांगल्या पद्धतीने धार देऊन या अवजारणा महाराष्ट्रभर मागणी मिळून दिली.
सुनील लोहार यांचे शिक्षण बी कॉम पर्यंत झाले असून त्यांनी नोकरीच्या मागे लागता आपल्या व्यवसायाकडे वळले.यात त्यांनी अपार मेहनत घेऊन महाराष्ट्र भरातील अनेक शेतकरी ग्राहक जोडलेत.
हा व्यवसाय करताना त्यांना वाटले की आपण देखील इतर लोकांप्रमाणे समाजाचे काही देणे लाभतो,म्हणून त्यांनी दहा वर्षापासून पत्रकारिता सुरू केली.आजपर्यंत त्यांनी विविध पोर्टल न्युज मध्ये काम करीत सद्या दैनिक लोकमत कुऱ्हाड चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.
घरात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असावी म्हणून त्यांनी लहान भाऊ प्रवीण रमेश लोहार यास पोलीस खात्यात दाखल केले.
आजपावेतो शेती व्यवसाय ,तसेच आपला लोहार काम व्यवसाय सांभाळून ते पत्रकारितेच्या माध्यमातून निःपक्ष,निर्भिड सेवा करत आहे.
तसेच बातमी लिहिण्या मागचा दृष्टिकोन असा की आज 20 जुलै रोजी त्यांचा चाळीस वा वाढदिवस आणि त्यांनी सुवर्ण महोत्सवाकडे सुरू केलेली यशस्वी वाटचाल अधिक सुखरूप , परमेश्वराच्या,आपण सर्वांच्या आशीर्वादाने हा संसार रुपी गाडा यशस्वीपणे ओढावा, तसेच *पत्रकारिता परम धर्म* या वाक्या प्रमाणे त्यांनी समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा अधिकाधिक मोका मिळो याच वाढदिवसानिमित्त भाऊंना हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment