वरसाडे प्र.पा. येथे गोरगरीबांना दिवाळी मिठाई वाटप..

 पिंपळगाव हरे वार्ताहर दिपक मुलमुले पत्रकार  9595470800                          

 वरसाडे प्र.पा. येथे गोरगरीबांना दिवाळी मिठाई वाटप..


दिवाळीत प्रत्येकाच्या घरावर लाईटींग , आकाशकंदील लावलेला असतो. घराघरात चिवडा , शंकरपाळे , चकली इ. गोडधोड पदार्थ बनवले जातात. पण खेडेगावातली परिस्थिती इतकी बिकट असते की कित्येक घरासमोर ना लाईटींग असते , ना आकाशकंदील असतो ना तर घरात चिवडा असतो ना तर गोडधोड बनवलेलं असतं. वरसाडे प्र पा येथेही आर्थीक परिस्थिती हलाकीची असलेली , हातमजुरीवर संसाराचा गाढा ओढणारी शेकडो कुटूंब आहेतं. आणि गावातील अशा अनेक घरात आपण दिवाळी फराळ पोहचवला पाहिजे हे कर्तव्य समजुन गावात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ग्रा. सदस्य श्री. गोकुळ राठोड ( बंन्टी ) , श्री.अमोल राठोड , श्री. रामकिसन राठोड , ग्रा.सदस्य श्री.पवन पवार , ग्रा. सदस्य श्री. प्रकाश जाधव व सहकारी मित्रांनी दिवाळी फराळ व मिठाई गोरगरीबांच्या घरात पोहचवली. या आनंदाच्या क्षणात गोरगरीबांच्या आनंदाचा विचार करणाऱ्या व गावात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या या तरुणांच अनेकांकडून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.