मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. आज दि.१५ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी दिव्यांगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या *माजी विद्यार्थी संघ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालयात स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या आठवड्यापासून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या चित्रकला , रांगोळी , मैदानी खेळ,नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन व नशा मुक्त भारत नशा मुक्ती कार्यक्रम वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिशय आनंदाने उत्साहत देशभक्तीने प्रेरित होऊन महोत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला. घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी ...