ग्राम विकास विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.अंदाजे 1 कोटी रुपयांची देणगी इमारत बांधणी साठी जमा.
ग्राम विकास विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न. अंदाजे 1 कोटी रुपयांची देणगी इमारत बांधणी साठी जमा. पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालयाला तब्बल 65 वर्षे पूर्ण झाल्याने माजी विधार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सन 1965 पासून चे माजी विद्यार्थी हजर होते.मेळाव्याचे मुख्य कारण म्हणजे ग्राम विकास विध्यालयाच्या मुख्य इमारतीस आज जवळपास 65 वर्ष झाले असून इमारत जीर्ण होत आहे.काही वर्षा पूर्वी रात्रीच्या वेळेस एका बाजूकडील इमारत रात्रीच्या वेळी अचानक पणे पडण्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही पण भविष्यात असा प्रसंग येऊ नये त्या साठी ग्राम विकास मंडळ अध्यक्ष, चिटणीस,व संचालक मंडळ यांनी नवीन इमारत बांधण्याच्या निर्यण घेतला त्या अनुषंगाने हा मेळावा बोलावण्यात आला होता. मेळाव्याची सुरुवात आज हरिभाऊ सभागृह येथे कार्यक्रमाचे उदघाटक माजी कुलगुरू आण्णासाहेब के.बी. पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वल करून मेळाव्याची सुरवात करण्यात आली.माजी विध्यार्थी मेळाव्याला अध्यक्ष म्हणून सेवा निवृत्त प्राध्यापक नवनाथ दंडगव्हाळ हे लाभले...