Posts

Showing posts from February, 2023

पद्मवंशिय तेली समाज मंडळ, महाराष्ट्र राज्य तर्फे प्रति पंढरपूर पिंपळगाव हरे. येथे आज दि.14 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

Image
१४ फेब्रु. २०२३ रोजी महाराष्ट्र पद्मवंशिय तेली समाज मंडळ, महाराष्ट्र राज्य तर्फे प्रति पंढरपूर पिंपळगाव हरे. येथे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे  सर्व राज्यांतील वधू-वरांसाठी पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे भव्य दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी  केलेले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे, ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण व युवक, क्रीडामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार उमेश पाटील, खासदार रक्षा खडसे, पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम हा श्री गोविंद समर्थांच्या पावनभूमीत श्री क्षेत्र प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा येथे १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ०१:०५ मी संपन्न होणार आहे. या मंगलमय सोहळ्यासाठी सर्व समाज बांधव इष्टमित्र...

विनोद विश्वनाथ महाजन यांची पीक पीक संरक्षण सहकारी संस्था चेअरमन पदी बिनविरोध निवड.

Image
  विनोद विश्वनाथ महाजन यांची पीक पीक संरक्षण सहकारी संस्था चेअरमन पदी बिनविरोध निवड. पीक संरक्षण सहकारी संस्था  पिंपळगाव हरेश्वर. ता. पाचोरा जि.जळगाव  चेअरमन  पदी विनोद महाजन  यांची बिनविरोध निवड...तसेच व्हाईस चेअरमन पदी उत्तम दगडू सावळे यांची निवड करण्यात आली. यावेळी हरी हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, गोविंद महाराज मंदिर संस्थान अध्यक्ष व विश्वस्त, तसेच सर्व पीक संरक्षण सहकारी संस्था  पिंपळगाव हरेश्वर.येथील चेअरमन,व्हाईस चेअरमन, सचिव, गावातील ग्रामस्थ उपस्तित होते...

पोलीस स्टेशन पिंपळगाव हरे येथे शिव जयंती,महाशिवरात्री व शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटी बैठक संप्पन्न.

Image
पोलीस स्टेशन पिंपळगाव हरे येथे शिव जयंती,महाशिवरात्री व शिव महापुराण कथेच्या नियोजनासाठी शांतता कमेटी मिटिंग संप्पन्न. पिंपळगाव हरेश्वर येथे येणाऱ्या आगामी  महाशिवरात्री, शिव जयंती,, व शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद वाघमारे यांच्या उपस्तित  हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, विश्वस्त, तंटा मुक्ती अध्यक्ष,पत्रकार, तसेच गावातील ग्राम पंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती शिव जन्मोत्सव समिती पिंपळगाव हरेश्वर व ग्रामस्थ पि.हरे.यांच्या उपस्तित पार पडली. यावेळी स.पो . नि. महेंद्र वाघमारे यांनी सर्व आगामी उत्सव शांततेच्या मार्गाने पार पडावे यासाठी मार्गदर्शन केले तसेच गावातील प्रतिष्टीत व्यक्तींनी आपआपले मत मांडले. यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस नाईक अरुण राजपूत,हरी हरेश्वर मंदिर संस्थान अध्यक्ष, सर्व विश्वस्त, शिव जन्मोत्सव समिती तरुण. वर्ग, ग्राम पंचायत सदस्य, तंटा मुक्ती अध्यक्ष, पत्रकार, गावातील ग्रामस्थ, उपस्तित होते.