Posts

Showing posts from January, 2026

शालिग्राम मालकर यांचा क्रांती सेना शिवसेना विभागीय अध्यक्ष पदी निवडी बद्दल सत्कार संपन्न.

Image
शालिग्राम मालकर यांचा क्रांती सेना शिवसेना विभागीय अध्यक्ष पदी निवडी बद्दल सत्कार संपन्न. पिंपळगाव हरेश्वर येथील कृऊबा संचालक तथा हरिहरेश्वर मंदिर संस्थान चे माजी अध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर यांची आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारसीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना क्रांतिसेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी मुंबई येथे निवड केली,  निवडीबद्दल गुरुगोविंद सोसायटी चे चेअरमन बालू तुळशीराम बडगुजर व्हा चेअरमन विजय सावळे, संचालक राजधर मालकर, तोताराम मेटे , राजेंद्र गिते, सुरेश भडांगे, भीमाबाई मेटे, जयश्री बडगुजर यांनी तसेच ग्रामपंचायत पिंपळगाव च्या वतीने रवी गिते, उपसरपंच राहुल बडगुजर, गोरख पाटील, कोमल देशमुख, बी डी पाटील सर, पांडुरंग चोरमले, हमदेखा पठाण यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, सत्कार समारंभाचे आयोजन गुरुगोविंद सोसायटी च्या कार्यालयात करण्यात आले होते, यशस्वीतेसाठी सेक्रेटरी दीपक बोरसे, धान्य विभाग प्रमुख दिनेश बडगुजर, खत विभाग प्रमुख संजय मालकर, कर्मचारी अशोक मालकर यांनी प्रयत्न केले. मालकर यांनी सत्काराबद...

श्वेता सीमा विनोद पाटील शौर्य पुरस्काराने सन्मानित.

Image
श्वेता सीमा विनोद पाटील शौर्य पुरस्काराने सन्मानित पुणे येथील पत्रकार भवनात आज मदत वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्वेता सीमा विनोद पाटील यांना *शौर्य पुरस्कार* प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना श्वेता पाटील यांनी, “हा सन्मान स्वीकारणं म्हणजे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे, याची पूर्ण जाणीव आहे,” अशी भावना व्यक्त केली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही मुलींवर आणि महिलांवर अत्याचार होणं, तसेच अनेक वेळा त्यांना व्यवस्थेकडून अपेक्षित मदत न मिळणं ही अत्यंत दुःखद बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. “अशी परिस्थिती कोणत्याही मुलीवर किंवा महिलांवर येऊ नये यासाठी समाजातील सर्वांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे. हेच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ठरेल,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल मदत वेल्फेअर ट्रस्टच्या अध्यक्षा दिपाली वारुळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे श्वेता सीमा विनोद पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. अनाथ मुलांसाठी ट्रस्टकडून सुरू असलेलं कार्य अत्य...