Posts

Showing posts from November, 2025

मनुमाता नगरात रस्ता ‘चोरी’ — गावभर चर्चेला उधाण!

Image
मनुमाता नगरात रस्ता ‘चोरी’ — गावभर चर्चेला उधाण ! पिंपळगाव हरेश्वर –मनुमाता नगरात , वार्ड क्रमांक ३ मध्ये गेल्या काही दिवसांपासून एक प्रसिद्ध कुजबुज कानावर पडतेय— *रस्ता चोरीला गेला आहे! होय, हे चुकून लिहिलं गेलं नाहीये. काँक्रीटचा रस्ता मंजूर झाल्याचं कॉलनीतील लोक सांगतात… पण रस्ता बांधला काही गेला नाही. म्हणजे मंजुरी कागदावर, आणि प्रत्यक्षात… शून्य किलोमीटरचा काँक्रिटचा शानदार रस्ता! या ‘चोरलेल्या रस्त्या’ची बातमी गावभर पसरताच पिंपळगाव हरेश्वरात एकाचवेळी गंभीर चर्चा आणि कडवट हशा सुरू आहे.  कॉलनीतील नागरिकांनी आता ठरवलंय — " आमचा काँक्रिटचा रस्ता कोणी चोरला ते शोधायचं, प्रशासनाला जाब विचारायचा, आणि गरज पडली तर आंदोलन करायचंच!" दरम्यान, रस्त्याअभावी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांची रोज तारेवरची कसरत सुरूच आहे.  कॉलनीतील लोकांचा सवाल अगदी थेट आहे — “आम्ही मतदान करतो, आम्ही गावचेच नागरिक आहोत… मग आमच्या रस्त्याकडे ग्रामपंचायतीचं लक्ष नेमकं कधी वळणार?” आता रस्ता कोणी ‘चोरला’, तो ‘कुठे लपवला’, आणि तो ‘परत मिळेल का’ — याचे उत्तर प्रशासन देणार का, ...

पाचोरा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन...

Image
पाचोरा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे दि: 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी शिक्षण विभाग व कनिष्ठ महाविद्यालय समुपदेशन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संबोधनात प्रा श्रीमती जयश्री वर्मा - वाघ यांनी मालेगाव लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पोस्टर दाखवून पोक्सो कायद्याची सखोल माहिती दिली. या संबोधनात महाविद्यालयाच्या वतीने पीडित यज्ञा बाळाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.   सदर संबोधनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील हे होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ जे पी बडगुजर यांनी संबोधनाचे प्रास्ताविक केले. संबोधनाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांनी केले तर प्रा कविता महाजन यांनी आभार मानले. प्रा डॉ सुनिता गुंजाळ यांनीही विद्यार्थ्यांना कायद्याचे समायोचीत मार्गदर्शन केले.  शिक्षण विभाग व पाचोरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संशोधनात वरिष्ठ महाविद्यालयाचे उ...