सामाजिक व अध्यात्मिक कार्यकर्ते संदीप पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.
सामाजिक व अध्यात्मिक कार्यकर्ते संदीप पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा. पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव येथे 10 ऑगस्ट रविवार रोजी सामाजिक कार्यकर्ते भाजपा*अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रचारक संदीप भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा,व सेवेकरांसाठी १२ लक्ष जप लिहिण्यासाठी वह्या वाटप करण्यात आल्या व स्नेहभजनाने कार्यक्रम संपन्न झाला . या वेळेस सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक, वैद्यकीय, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष जि प सदस्य मधू भाऊ काटे होते , प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदाड उपसरपंच नरेंद्र बापू , शिंदाड सोसायटीचे चेअरमन समाधान भाऊ, व सोसायटीचे संचालक पाचोरा सेवा केंद्राचे प्रतिनिधी गोकुळ दादा, रामभाऊ जळतकर, प्रताप दादा,संजय दादा, बि.एस.दादा, पिंपरी सेवा केंद्राचे प्रतिनिधी प्रमोद पाटील सर व त्यांचे सहकारी बाळकृष्ण धुमाळ,शरद शेळके, किरण पांडे, पंढरी पाटील, पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बं...