नाग पंचमी ला जिवंत सापाच पुजन न करता प्रतिमेचे पुजन करा सर्पमित्र दिनेश गायकवाड
नाग पंचमी ला जिवंत सापाच पुजन न करता प्रतिमेचे पुजन करा सर्पमित्र दिनेश गायकवाड मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 9595470800 प्रमुख चार जातीच्या विषारी सापांपासुन सतर्कता बाळगा. नाग, मण्यार,घोणस,फुरसे या चार विषारी सापांच्या जाती आहेत. सापाविषयीची श्रध्दा असावी अंधश्रद्धा नको... विषारी सापाचा दंश झाल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे. पाचोरा तालुक्यासह पंचक्रोशीत दररोजच्या सर्पदंश झालेल्या घटना बघायला मिळतात... काही सर्पदंश झालेल्या लोकांना योग्य औषधोपचार न झाल्यास दगावतात तर काही जंतर मंतर करण्यातसाठी मांत्रिकाकडे जातात त्यांचा अमुल्य वेळ मांत्रिकाकडे गेल्यामुळे तो रुग्ण दगावतो तर सर्पदंश झाल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे.. आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमी विषयी माहिती वाचल्यास तुम्हाला कळेल की, फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात ...