Posts

Showing posts from February, 2026

“प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ यांची सकारात्मक ऊर्जा व तणावमुक्त जीवनशैली : विशेष मुलाखत उद्या 2 फेब्रुवारी 2026 रोजी आकाशवाणीच्या newsonair या अँपवर”

Image
“प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ यांची सकारात्मक ऊर्जा व तणावमुक्त जीवनशैली : विशेष मुलाखत उद्या 2 फेब्रुवारी 2026 रोजी आकाशवाणीच्या newsonair या अँपवर” ज्ञान, साधना, कला आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम म्हणजे प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम. श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगका कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका असलेल्या प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम यांची सकारात्मक ऊर्जा, मानसिक संतुलन व तणावमुक्त जीवनशैली या विषयावर विशेष मुलाखत दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता ‘newsonair’ अ‍ॅपवर जळगाव आकाशवाणीवर प्रसारित होणार असून, ही मुलाखत श्रोत्यांसाठी जणू नवसंजीवनीच ठरेल. ही मुलाखत जळगाव आकाशवाणीच्या निवेदिका सौ. वैदेही नाखरे मॅडम यांनी अतिशय प्रभावीपणे घेतली आहे. प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम म्हणजे एका व्यक्तीत साकारलेले अनेक गुणांचे इंद्रधनुष्य  त्या केवळ प्राध्यापिका नाहीत, तर 1) रेकी आचार्य 2) योग शिक्षिका 3)भारतीय लोकनृत्य व बेसिक क्लासिकल डान्समध्ये टॉपर 4) फाइन आर्ट्स टॉपर 5) कॅरम गोल्ड मेडलिस्ट 6) क्रिके...