पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.
पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर. काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार , काँग्रेस स्थापना दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे निर्धार. काँग्रेस पक्ष पाचोरा तालुक्यात आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार असून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य सरचिटणीस ॲड. भाऊसाहेब आजबे यांनी केले. पिंपळगाव हरेश्वर येथे काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित चर्चा व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एनएसयूआयच्या महासचिव श्रीमती श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या उमेदवारीस काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी अधिकृत घोषणा ॲड. आजबे यांनी केली. त्यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कटिबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोमवंशी यांनी सत्ताधारी सरकारवर टीका करताना, काँग्रेस...