Posts

Showing posts from March, 2024

श्री समर्थसिंग पाटील यांना ICONIC MENTOR IN COACHING AWARDS 2024.

Image
श्री समर्थसिंग पाटील यांना ICONIC MENTOR IN COACHING AWARDS 2024. आराध्या प्रतिष्ठान व ए.व्ही.अबॅकस वैदिक गणित अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष श्री समर्थसिंग पाटील यांना आत्मीय फौंडेशन मंबई चे संचालक डॉ. चिराग वाघेला, रोहित कोकानी आणि विद्याप्रबोधिनी चे संचालक श्री योगेश पाटील सर यांच्या माध्यमातून कोचिंग क्षेत्रात अबॅकस आणि वैदिक गणित विषयात गेल्या 15 वर्षा पासून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन  श्री समर्थसिंग पाटील यांना आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते ICONIC MENTOR IN COACHING AWARDS 2024 देऊन सन्मानित करण्यात आले. समर्थसिंग पाटील हे अबॅकस आणि वैदिक गणित कोर्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करणे, एकाग्रता, स्मरण शक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करतात. तसेच बेरोजगार महिला व पुरुषांना प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय सुरुकरून रोजगार मिळवून देण्याचे कार्य करतात.तसेच समर्थसिंग रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल चे सदस्य आहेत. यांना सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरातून, तसेच त्यांच्या सोबत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करणाऱ्या इतर शिक्षक ब...

रंजना कोळी यांना यंदाचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर.

Image
रंजना कोळी यांना यंदाचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर.. मातृसेवा फाउंडेशन ठाणे व शिक्षक ध्येय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनी निकाल जाहीर करण्यात आला. सौ. रंजना सुपडू कोळी इंगळे न्यू इंग्लिश स्कूल बेटावद बु!! ता:- जामनेर जि:- जळगाव  यांना यंदाचा कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.  त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी कला विषयांचे विविध उपक्रम व स्पर्धा राबविणे या विषयावर उपक्रम अहवाल सादर केला होता. महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे. त्यांचे कौतुक करून प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे.त्यांच्या उपक्रमाची माहिती राज्यातील सर्वांना व्हावी हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. यातील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र घरपोच पाठविण्यात येणार असून सर्व सहभागी महिलांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात आले आहे. यावर्षी राज्यभरातील एकूण ३० महिलांना या राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ...