पिंपळगाव हरेश्र्वर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न...
पिंपळगाव हरेश्र्वर येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न.. बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती निमित्त ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. व याच हेतून पिंपळगाव हरेश्वर येथील मूकबधिर शाळेमध्ये मध्ये वडगाव येथील भा.ज.पा.आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील व देशदूचे पत्रकार गजानन भाऊ लादे सातगाव डोंगरी यांच्या माध्यमातून पत्रकार सन्मान सोहळा दि.७-१-२०२४ रविवार रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळेस पिंपळगाव हरेश्र्वर परीसरातील सर्व पत्रकार बंधुंना आमंत्रित करण्यात आले.व या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अर्जुन जाधव सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळगाव हरेश्वर येथील एपीआय महेंद्र वाघमारे ,पीएसआय अमोल पवार व संदीप पाटील व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किशोर लोहार व मुक बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर होते. या वेळेस सुत्र संचालन मनगटे सर यांनी केले . सर्वप्रथम दीप प्रज्वलन बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेचं पुजन मान्यवरांच्या ...