वरसाडे प्र.पा. येथे गोरगरीबांना दिवाळी मिठाई वाटप..
पिंपळगाव हरे वार्ताहर दिपक मुलमुले पत्रकार 9595470800 वरसाडे प्र.पा. येथे गोरगरीबांना दिवाळी मिठाई वाटप.. दिवाळीत प्रत्येकाच्या घरावर लाईटींग , आकाशकंदील लावलेला असतो. घराघरात चिवडा , शंकरपाळे , चकली इ. गोडधोड पदार्थ बनवले जातात. पण खेडेगावातली परिस्थिती इतकी बिकट असते की कित्येक घरासमोर ना लाईटींग असते , ना आकाशकंदील असतो ना तर घरात चिवडा असतो ना तर गोडधोड बनवलेलं असतं. वरसाडे प्र पा येथेही आर्थीक परिस्थिती हलाकीची असलेली , हातमजुरीवर संसाराचा गाढा ओढणारी शेकडो कुटूंब आहेतं. आणि गावातील अशा अनेक घरात आपण दिवाळी फराळ पोहचवला पाहिजे हे कर्तव्य समजुन गावात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ग्रा. सदस्य श्री. गोकुळ राठोड ( बंन्टी ) , श्री.अमोल राठोड , श्री. रामकिसन राठोड , ग्रा.सदस्य श्री.पवन पवार , ग्रा. सदस्य श्री. प्रकाश जाधव व सहकारी मित्रांनी दिवाळी फराळ व मिठाई गोरगरीबांच्या घरात पोहचवली. या आनंदाच्या क्षणात गोरगरीबांच्या आनंदाचा विचार करणाऱ्या व गावात सामाजिक कार्यात न...