पिंपळगाव हरेश्वरमध्ये निकृष्ट दर्जाच्या गटारीच्या कामामुळे संताप...
पिंपळगाव हरेश्वरमध्ये निकृष्ट दर्जाच्या गटारीच्या कामामुळे संताप... पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेल्या अंडरग्राउंड गटारीच्या कामावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनतेचे सेवक म्हणून निवडणूक लढवून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्यच आता विकासकामांमध्ये ठेके घेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात नुकतेच अंडरग्राउंड गटारीचे काम करण्यात आले. मात्र हे काम पूर्ण होऊन दोन महिनेही उलटले नसताना गटारीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी गटारी खचणे, फुटणे तसेच पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, अशा कामांसाठी आवश्यक तांत्रिक अनुभव नसताना काही ग्रामपंचायत सदस्यांनीच ठेके घेतल्याची चर्चा गावात सुरू आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच संबंधित काम...