एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..
एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.. तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या लग्नानंतर काही दिवसांनी तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे ती सध्या आपल्या माहेरी भावाकडे राहत होती. दिनांक 23 ऑक्टोबरच्या सायंकाळी, गावातील दोन तरुणांनी सदर महिलेस दुचाकीवर बसवून नेले. ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती असतानाही, दोघांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेची माहिती गावकऱ्यांमध्ये पसरताच खळबळ उडाली. त्यानंतर पीडितेच्या भावाला हा सर्व प्रकार समजला. भावाने तत्काळ पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेग...