महाराष्ट्र माळी समाज महासंघाची बैठक उत्सहात संपन्न,२५ जानेवारी रोजी वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची बैठक उत्सहात संपन्न, २५ जानेवारी रोजी वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन कार्यकारी संपादक:- गायत्री क्षिरसागर जळगांव:- महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगाव जिल्हा पदाधिकारी कार्यकारणीची बैठक आज रविवार ता.29 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह पद्मालय जळगाव या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीत नविन जिल्हाध्यक्ष निवड, समाज प्रबोधन व वधू वर परिचय मेळावा ता.25 जानेवारी रोजी घेण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी समाज संघटन यासाठी गाव तेथे माळी महासंघाची शाखा हे अभियान राबवीण्याचा संकल्प करण्यात आला. जिल्ह्यामध्ये माळी समाजाची ताकत मोठी असून त्याचा उपयोग समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रॊजगार कसा उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी जिल्ह्यातील विविध उदयोजक यांच्याशी पदाधिकारी संपर्क साधणार आहेत. समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा बंद करन्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नलिन महाजन हे होते. यावेळी महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्...