पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा उत्तम कामगीरी केल्या बद्धल अधिक्षक यांच्या हस्ते सत्कार.
पिंपळगाव पोलिसांचा अधीक्षकांतर्फे सत्कार... पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सपोनि. प्रकाश काळे आणि त्यांच्या टीमने चोरी झालेली पिकअप गाडी पकडल्याने, या टीमचे पोलिस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांनी कौतुक केले आहे. पिंपळगाव हरे. येथील मंगल कार्यालयाजवळून ही पिकअप गाडी जात असताना या गाडीवरील चालक शेख अरबाज शेख जलीम (२०) याच्या संशयास्पद हालचाली पोलिसांना दिसून आल्या. पोलिसांनी चालकाकडे गाडीची कागदपत्रे मागितली असता, ती न मिळाल्याने पोलिसांनी चालकासह गाडी पोलिस स्टेशनला नेली. तेथे त्याला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस करण्यात आली. त्यावेळी त्याने गाडी चोरीची असल्याने सांगितले. त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांच्याहस्ते सपोनि प्रकाश काळे यांच्यासह पोलिस अतुल पवार, दीपक पाटील, अमोल पाटील, अभिजीत निकम आदींचा सत्कार करण्यात आला.